बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूर
(नोंदणी क्र. एफ ३४१३२ एन. - महाराष्ट्र शासन मान्य)
संस्थेचा परिचय
बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूर ही समाजातील सर्व घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्यरत आहे.
बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समाजातील उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि अनुरूप वधू-वरांना एकाच विश्वासू व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने या डिजिटल वधू-वर सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
पारदर्शकता, सुरक्षितता आणि संपूर्ण गोपनीयता बाळगून समाजातील पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी योग्य जोडीदार शोधण्यात मदत करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
आमचे ध्येय (Vision & Mission)
- समाजातील प्रत्येक सुशिक्षित वधू-वरांसाठी १००% पडताळणी झालेले बायोडाटा उपलब्ध करून देणे.
- हुंडाविरोधी आणि सुलभ, सुसंस्कृत विवाह जुळवणीला प्रोत्साहन देणे.
- कुटुंबांच्या संमतीने आणि सुरक्षित वातावरणात योग्य नातेसंबंध जोडणे.
सौजन्य तेथे सोयरीक - "संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर" महाराज
सस्नेह नमस्कार, समाज बांधव आणि भगिनी,
आजच्या आधुनिक काळात अतिशय मार्मिकपणे विचार केला असता, असे लक्षात येते की माऊली आणि सर्व नाते अविवाहित असताना त्यांना सोयरीक संबंधाशी काय संबंध, परंतु माऊलीने समाजाचे कल्याणार्थ उपदेश करतांना ही ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथात समाविष्ट केलेली आहे.
आजच्या विज्ञान युगात आपण संगणक, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी उपकरणांचा वापर करून एकामेकांशी संबंध प्रस्थापित करीत असतो. त्यातुन आता लग्न जुळवणी करीता अनेक मॅट्रोमनी संस्था सातसमुद्राच्या पलीकडे जाऊन विवाह विषयक माहितीचे आदान प्रदान करण्यात अग्रेसर आहेत. या संस्था मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून स्वतःला सुधारणावादी समजतात. उच्चवर्गीय समजणाऱ्या लोकांकडून मोठमोठ्या रकमा घेऊन दिशाभूल करताना दिसून येतात. आता हा व्यवसाय झालेला असून त्याचे व्यापारीकरण झाले आहे त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.
पूर्वकाळ आणि आजची वास्तव्य स्थिती
पूर्वीच्या काळी आमची जेष्ठ मंडळी सतत म्हणायचे 'सोयरीक संबंध हे सात कोसात व्हावे.' त्याचे निश्चित एक कारण होते, ते म्हणजेच आपल्या माहितीतील समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या बैठक घेऊन सोयरीक करावी म्हणजे आदर्श विवाह संबंध प्रस्थापित होतील. मुल व मुली आपल्या घरच्या परंपरा आचार विचार रितीरिवाज, नितीमत्ता लक्षात घेऊन वैवाहिक जीवनाची वाटचाल यशस्विपणे करतांना दिसत होती. परंतु आज हे चित्र वेगळे दिसत आहे. अनेक विवाह प्रकरणात विसंगती झालेली दिसून येत आहे, मोठे पॅकेजस फ्लॅट, बंगला इगो या व इतर छोट्या कारणामुळे लग्नानंतर अवघ्या ४,६ महिन्यातच कौटुंबिक वादविवाद वाढत आहेत, सामाजिक व कुटुंबिक न्यायालयात अनेक केसेस प्रलंबित आहे. सुदृढ समाज रचनेसाठी हा एक गंभीर विषय निर्माण झालेला आहे. सगे - सोयरे व आप्तोष्ट यांच्या पासून सुधारणा वाहनांच्या भोवण्यात सापडून आपण दूर चाललो आहोत. यामुळे खूप सामाजिक समस्या निर्माण होत आहे.
कुणबी समाजाचे आराध्य, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या संबंधात म्हटले आहे की सत्य बोले मुखे. आमच्या संधाने गावर विचारविमर्श करून सोयरीक वायुपुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही ज्यांचा जांख्यातो, जे या संधाचे आजीवन सदस्य व क्रियाशील सदस्य आहेत, त्यांच्या मार्फतच पुस्तिकेतील माहिती संकलित करून ती प्रकाशित करताना समाजबांधवावर कोणताही आर्थिक बोझा पडणार नाही याची काळजी घेऊन सेवा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
धन्यवाद..! जय तुकोबा...
बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ मार्फत केलेले कार्य
समाजाच्या उत्थानासाठी आणि कल्याणासाठी सातत्याने राबविलेले यशस्वी उपक्रम
कार्यकारी मंडळ व पदाधिकारी
संस्थेचे यशस्वी संचालन करणारे मार्गदर्शक पदाधिकारी
श्री.रविन्द्र कृष्णराव देशमुख
अध्यक्ष9860034509
श्री.अशोक रामरावजी पांडव
उपाध्यक्ष9823373700
श्री. राजेश बापूरावजी काकडे
सचिव9503553733
१००% गोपनीय व सुरक्षित
पालकांच्या संमतीशिवाय संपर्क क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती जाहीर केली जात नाही.
प्रमाणित व अस्सल स्थळे
प्रत्येक नोंदणीकृत प्रोफाईलची सत्यता आणि शैक्षणिक पात्रता संस्थेकडून तपासली जाते.
पालक साहाय्यता कक्ष
स्थळ निवडीपासून ते थेट संपर्कापर्यंत संस्थेचे प्रतिनिधी सातत्याने मार्गदर्शन करतात.
॥ कळकळीची विनंती ॥
तिरळे कुणबी समाजाचे एक प्रशस्त समाजभवन असावे अशा भावना अनेक समाजबांधवांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यादृष्टीने ज्या समाजबांधवाला भवनासाठी जागा दान द्यावयाची असेल किंवा आर्थिक योगदान द्यावयाचे असेल त्यांनी कृपया संपर्क करावा. आपले सहकार्य, हेच संस्थेचे यश! देऊ समाज विकासाला गती करू तिरळे कुणबी समाजाची प्रगती ॥
कार्यालयाशी संपर्क साधा